वरणगाव – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा “एल्गार” महामेळावा आगामी काळात होणार आहे. या मेळाव्यास ओबीसी नेते आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी होणाऱ्या महामेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी आज दिनांक ६ मार्च गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता बोदवड, दुपारी दोन वाजता मुक्ताईनगर, सायंकाळी ४ वाजता रावेर, यावल-साकली सायंकाळी ५.३० वाजता, भुसावळ येथे ६.३० वाजता आणि रात्री ८ वाजता जामनेर येथे बैठका आयोजित केल्या आहेत. बैठकांना अ.भा.म.फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक , उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयक अशोक नाले हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला आपल्या गावातील/ शहरातील बारा बलुतेदार समाजाचे घटक, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे आजी – माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, भुजबळ समर्थक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे ओबीसी, संघटनांचे पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन रावेर विभागीय कार्याध्यक्ष संतोष माळी, दिनेश माळी बोदवड, राजू माळी मुक्ताईनगर, पद्माकर महाजन रावेर, सुभाष महाजन साकळी, प्रा. जतिन मेढे भुसावळ, पवन माळी जामनेर यांनी केले आहे.


