मुक्ताईनगर यात्रा छेडखानी प्रकरण ; सकल लेवा महिला मंडळाच्यावतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन जाहिर निषेध

भुसावळ (प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर येथे यात्रेत केंद्रीय मंत्री यांच्या मुलीसह ३ मुलींची स्थानीक टवाळखोरांकडून झालेल्या छेडछाड प्रकरणाबद्दल येथील सकल लेवा महिला मंडळाच्यावतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून या घटनेचा जाहिर निषेध करण्यात आला आहे .

निवेदनात नमूद आहे की , मुक्ताईनगर येथे यात्रेत केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे तथा युवक कल्याण मंत्री यांच्या मुलीसह गावातील इतर मुलींची स्थानीक टवाळखोरांकडून झालेल्या छेडछाडी बद्दल सकल लेवा महिला मंडळ, भुसावळ जाहिर निषेध करीत आहोत. घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून शहरातील कोणत्याही सामान्य मुली सोबत असा प्रसंग उद्भवणार नाही अशा प्रशासनाने उपाय योजना कराव्यात, आरोपींवर त्वरीत कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा मिळावी तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कठोर कायदे करावेत आणि समाजात सुवव्यस्था नांदावी यासाठी शासनाने तत्पर रहावे.अशी मागणी आम्ही सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसराच्या अध्यक्षा व संचालक मंडळ यांनी केली आहे . यावेळी .प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देताना सकल लेवा महिला मंडळ, भुसावळच्या अध्यक्षा सौ. मंगला पाटील, सौ. आरती चौधरी,सौ.कावेरी चौधरी,सौ. वैशाली पाटील,सौ.वैशाली चौधरी, सौ. वैशाली धांडे,सौ.प्रगती पाटील व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होत्या . सदर निवेदन मुख्यमंत्री, निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना सुद्धा पाठवण्यात आले आहे