बोधगया महाबोधी विहार बी. टी. एम. सी. 1949 चा कायदा रद्द करा – भारतीय बौद्ध महासभाची मागणी

जळगांव: (प्रतिनिधी ) – जळगांव पुर्व ची भारतीय बौद्ध महासभेची महिला जिल्हा कार्यकरणीच्या नेतृत्वात बोधगया महाबोधी विहार बी. टी. एम. सी. 1949 चा कायदा रद्द करा आणि महाबोधी विहार बौद्ध च्या ताब्यात देण्यात यावे याबाबतचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, यांना जिल्हा अधिकारी पीयुष प्रसाद यांच्या मार्फत सदर निवेदन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर याच्या आदेशा नुसार देण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, राज्य संघटक लता तायडे, संरक्षण सचिव वनिता साळवे, लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे,मेजर रमेश साळवे, सीमा अहिरे, सुषमा इंगळे, माया तायडे, विद्या झनके, शोभा इंगळे , उज्ज्वला सपकाळे , प्रमिला इंगळे, ज्योती दामांडे, प्रमिला निकम, आशालता घोडेस्वार, सारिका बाविस्कर यांच्यासह सर्व तालुका व शहर महिला कार्यकारणी महिला उपस्थित होत्या.