भुसावळ विभागात जळगाव-भादली दरम्यान विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक

जळगाव-भादली रेल्वे स्थानकांदरम्यान (इगतपुरी-भुसावळ विभाग) किलोमीटर 423/17-19 येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 (NH-6) वरील तरसोद-फागणे चारपदरी उड्डाणपुलाच्या (ROB) बांधकामासाठी 58 मीटर गर्डर लाँच करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जात आहे. हा उड्डाणपूल तरसोद-फागणे (NH-6) महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत (किमी 422.700 ते किमी 510.00) अंतर्गत बांधला जात आहे. यासाठी भुसावळ विभागात अप व डाऊन लाईन तसेच तिसरी व चौथी लाईन यांवर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे खालील गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

दिनांक ०५.०३.२०२५ रोजी गाडयांचे रेगुलेशन्स –
१) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ५५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १२३३५ भागलपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

दिनांक ०६.०३.२०२५ रोजी गाडयांचे रेगुलेशन्स –
१) गाडी क्रमांक १२१०४ लखनउ – पुणे एक्सप्रेस विभागात १ तास १५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ५५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक १५६४८ गुवाहाटी -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
५) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

दिनांक ०७.०३.२०२५ रोजी गाडयांचे रेगुलेशन्स –
१) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ५५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक २२९४८ भागलपूर -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १५९४६ दिब्रुगढ -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

दिनांक ०८.०३.२०२५ रोजी गाडयांचे रेगुलेशन्स –
१) गाडी क्रमांक १२५२० अगरतला – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात १ तास १५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ५५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक १२३३५ भागलपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
५) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

दिनांक ०९.०३.२०२५ रोजी गाडयांचे रेगुलेशन्स –
१) गाडी क्रमांक १४३१४ बरेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात १ तास १५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ५५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक १२७४२ पटना – वास्को दि गामा एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
५) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन प्रवासाची योजना आखावी.