फैजपूर (प्रतिनिधी ) : फैजपूर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी या संदर्भातील आदेश काढले.

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कामकाज
2020 च्या त्रिपुरा बॅचच्या आयपीएस अधिकारी अन्नपुर्णा सिंह यांची फैजपूर पोलीस उप विभागात सहायक पोलीस अधीक्षक तथा डीवायएसपीपदी नियुक्ती झाली होती. आयपीएस अन्नपुर्णा सिंह या कडक शिस्तीचा अवलंब करणार्या अधिकारी आहेत.
महाराष्ट्र 2019 च्या आयएएस जळगाव जि.प.चे सीईओ बॅचचे अंकित सीईओ यांच्यासोबत अन्नपुर्णा सिंह यांचा विवाह झाला आहे त्यामुळे भारतीय पोलिस सेवा (कॅडर) नियम 1954 चा नियम 5 च्या उप नियम (2) नुसार त्रिपुरा आणि महाराष्ट्र सरकारच्या सहमतीने अन्नपुर्णा सिंह यांना त्रिपुरा संवर्गातून महाराष्ट्र संवर्गात स्थानांतरीत करण्यात आले.
15 डिसेंबर रोजी अन्नपूर्णा सिंह यांची चोपडा उप विभागासाठी नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार त्या 18 डिसेंबर 2023 रोजी हजर देखील झाल्या होत्या. दरम्यान पाच अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले होते. त्यात अन्नपूर्णा सिंह यांची फैजपूर येथे 22 डिसेंबर 2023 रोजी बदली करण्यात आली होती.


