भुसावळ नगरपरिषदेची थकबाकी वसुली कारवाई – दोन दुकाने सील;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आठवडे बाजारातील शाळा क्रमांक 5 जवळील मालमत्ता धारक . सैफुद्दीन मुसाजी मास्टर यांच्या मालकीच्या रहिवासी इमारती व दोन दुकानांवर मागील सात वर्षांपासून मालमत्ता कराची थकीत रक्कम रुपये 2,69,237/- आहे. सदर मालमत्ता धारकास वेळोवेळी मागणी बिले आणि जप्तीची नोटीस देण्यात आली होती. तसेच कराची रकम भरणे बाबत वारंवार विनंती देखील करण्यात आली मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

यावेळी त्यांनी “हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे” मात्र, न्यायालयाचे थकीत रक्कम न भरणे बाबत कोणतेही आदेश नसल्याने व त्यांना थकीत रकमेची निम्मी रक्कम भरणे बाबत वारंवार विनंती केली मात्र त्यांनी सदरील रक्कम भरण्यास नकार दिल्याने यास्तव, दि.28.2.25 रोजी त्यांच्या मालकीच्या दोन दुकानांना सील करण्यात आले आहे.

ही कारवाई उपमुख्य अधिकारी शेख परवेज अहमद, प्रशासकीय अधिकारी अजित भट, अनिल आहूजा, विष्णू राठोड, दीपक अहिरे, मुकेश पाटील, गोपाल पाली, तसेच भाग कारकून सुनील पाटील, तौसिफ खान आणि जय पिंजाणी यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.

सदर कारवाई प्रशासक जितेंद्र पाटील व राजेंद्र फातले,मुख्याधिकारी भुसावळ नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

मालमत्ता धारकांना आवाहन:

भुसावळ शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी त्वरित मालमत्ता कराची थकीत रक्कम नगरपरिषद कार्यालयात जमा करावी. अन्यथा, यापुढे थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची व आवश्यकतेनुसार पाणी कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल.