जळगांव:- जळगाव खान्देश येथे
बुद्धगया येथील भिक्खूंच्या उपोषणाला पाठिंबा तसेच त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ दिनांक 24 /2 /2025 सोमवार रोजी निवेदन महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी मार्फत जिल्हा कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी निवेदन देताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखडे, केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार, राज्य महासचिव देवचंद्र समदुर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई सिद्धार्थ पैठणे, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सागर शिरसाट,सुमित सोनवणे जिल्हा महासचिव जळगाव खान्देश,
सुमित निकम जिल्हा उपाध्यक्ष जळगाव खान्देश, प्राजक्ता तायडे महानगर अध्यक्ष जळगाव खान्देश आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होती.
निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या

१)बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे
२)बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात
३)जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949 च्या व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्ती करावी
अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.असे आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम कडून महानगर अध्यक्षा प्राजक्ता तायडे यांनी कळविले.


