जळगाव (प्रतिनिधी ) -कोथळी तालुका मुक्ताईनगर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तथा दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी राजेश पाटील यांच्या वाहनाला रविवारी मध्यरात्री एरंडोल ते पिंपळकोठा दरम्यान, भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांच्या चार चाकी चाकीचा चक्काचूर झाला असून त्यांची पत्नी सौ रुपालीबाई पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजेश पाटील व त्यांची दोन्ही मुले अपघातात जखमी झालेली असून त्यांच्यावर एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. अपघाता झाल्यानंतर जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींनी मदतीचा हात दिला. शासनाच्या ॲम्बुलन्स 108 सेवेने त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णाला दाखल करण्यात आले मात्र ॲम्बुलन्स उशिरा पोहोचल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.




