संक्रांतनिमित्त हळदी कुंकवात रोपाचे वाण : निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम :

जळगाव – निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था त्याच्या संयुक्त विद्यामाने दिनांक 19 जानेवारी 2025 रविवार रोजी संक्रांत सणानिमित्त कोठरी नगर येथे दुपारी ठीक 4.00वाजता हळदी कुंक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

एक आगळे वेगळे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा यांनी केलेले आहे. पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने व संतुलन राखण्याच्या दृष्टीने तसेच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही भावना मनात रुजावी या उद्देशाने सर्व महिलांना संक्रांतीचे हळदीकुंकू वाण म्हणून एक रोप भेट देण्यात येणार असून त्या रोपाचे रोपण व संवर्धन करावे व पर्यावरणाचे रक्षण करावे. याप्रसंगी डॉ हर्षदा पाटील यांचे पर्यावरण व संतुलन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ मनीषा पाटील यांनी केलेले आहेत.