भुसावळ (प्रतिनिधी) : रक्तदाना सारखे सर्वश्रेष्ठ दान दुसरे कोणतेच नसून रक्तदान करून खरी समाजसेवा करून मानवतेचे दर्शन घडविणारे तरुण तडफदार व धडाडीचे अत्यंत संवेदनशील स्वभाव असणारे येथील संजीवनी ब्लड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर विसपुते यांना नुकताच दरभंगा बिहार येथे राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .
दरभंगा बिहार येथे दोन दिवसीय राष्ट्रीय रक्तदाता प्रतिनिधी संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते या सम्मेलनामध्ये भारत देश नेपालसह २१५ संस्थानी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम शतकवीर रक्तदात्यांच्या हस्ते नुकतेच दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी दिप प्रज्वलन करून, कार्यक्रमाचे थाटात उदघाटन झाले या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या देशातील सर्व संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांची कार्यशाळा समर्पण मिथिलाचे राष्ट्रीय महासचिव दिपक कुमार महथा, राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश प्रसाद, कोषाध्यक्ष रंजीत श्रीवास्तव, राकेश रंजन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली यावेळी सांस्कृतिक नृत्याचे प्रसारण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन समर्पण मिथिला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मृदुल कुमार शुक्ला (वरिष्ठ भाजपा नेता दरभंगा बिहार ) यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिर संपन्न झाले . या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडविले


या रक्तदान शिबिरात सर्वांत जास्त महाराष्ट्रच्या रक्तदात्यांनी रक्तदान करून एक दा पुन्हा सिद्ध करून दिले रक्तदान क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबरला आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यासह भुसावळ येथील संजीवनी ब्लड गृपच्या माध्यमातून सागर विसपुते व गृप यांचे गेल्या ७ वर्षां पासुन नियमित एक दोन दिवसांच्या फरकाने ग्रुपतर्फे रक्तदान तसेच ८ वर्षांपासून दर ९० दिवसांनी स्वतः सागर विसपुते रक्तदान करत असतात त्याच्या या रत्न पुरस्काराने भुसावळचे नाव लौकिकात निश्चितच भर पडली आहे . अविरतपणे व अखंड असे रक्तदानाचे सर्वाधिक व भरीव कार्य असल्याचे सांगून सागर विसपुते व गृपच्या कार्याची प्रशंसा डॉ. मृदुल कुमार शुक्ला यांनी केली .डॉ. मृदुल कुमार शुक्ला डॉ. सौ. गुंजन द्विवेदी यांनी दलान रिजार्ट हॉटेल येथे सागर विसपुते यांना पुष्पहार , शाल , शिल्ड प्रमानपत्र , असा स्वरूपात राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी गृपचे किशोर पाटील हे सुध्दा उपस्थित होते . यापुरस्काराबद्दल सागर विसपुते व संजीवनी ब्लड गृपचे मित्रपरिवारासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
सत्कार केवळ माझा नसून संजीवनी ब्लड ग्रुपचा आहे ….. सागर विसपुते
गेल्या 8 वर्षांपासून संजीवनी ग्रुपचे रक्तदानाचे कार्य सुरू आहे या गृपच्या प्रेरणेने शहरासह जिल्ह्यातच नव्हे तर अनेक ठिकाणी बऱ्याच संस्था नी सुद्धा रकदानाचे महान कार्य हाती घेतले .हे बघून संजीवनी ग्रुपने केलेल्या जनजागृतीचे कार्य कौतुकस्पद ठरल्याचे समाधान वाटते. हा सत्कार केवळ माझा नसून हा संजीवनी ब्लड ग्रुपचा सत्कार असल्याचे सत्कारार्थी सागर विसपुते यांनी सातपुडा कन्या यांचेशी बोलतांना सांगितले .



