भुसावळ – येथील बियाणी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून के नारखेडे शाळेचे मुख्याध्यापक युवराज झोपे हे तर बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी , सचिव डॉ.संगीता बियाणी, विनोद बियाणी,राजेश पारीख,प्रवीण भराडिया , प्रिन्सिपल रुद्रसेन गंठिया उपस्थित होते. शाळेत झालेल्या भाला फेक,गोळा फेक,थाली फेक,रनिंग ,स्लो सायकलिंग रेस अश्या विवीध स्पर्धे मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता अशा नर्सरी ते बारावीच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांना शिल्ड ,मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले. यावेळी डॉ संगीता बियाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळणे पण गरजेचे असते, खेळांमधून सुद्धा विद्यार्थी हा खूप पुढे जाऊ शकतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीना खान, प्रगती टेंभुर्णीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रिंसीपल रुद्रसेन गंठीया यांनी मानले.

फोटो कॅप्शन – गुणवंत विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरववितांना डॉ संगीता बियाणी, सोबत डावीकडून रुद्रसेन गंठीया ,मनोज बियाणी, युवराज झोपे,राजेश पारीख,प्रवीण भराडीया आदी.



