भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाला मोठ्या उत्साहात प्रारंभ -भाजपाच्या विचारधारेशी जोडण्याची संधी – आमदार अमोल जावळे

फैजपूर : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या सूचनेनुसार राज्यभरात संघटन पर्व अभियानांतर्गत सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान अत्यंत यशस्वीपणे राबवले जात आहे. जळगाव जिल्हा पूर्वमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणी मेगा ड्राइव्हला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. यावल, रावेर, फैजपूर आणि परिसरात आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान राबवण्यात आले.

भाजपा विचारधारेशी जुळण्याची संधी
लोकसभा आणि विधानसभेतील निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेने भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणावर मतदान केले. आज या सदस्य नोंदणी अभियानाद्वारे आम्ही त्या जनतेला भाजपाशी अधिक जुडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, मोठ्या संख्येने नागरिक आज भाजपाशी जोडले जातील. हा एक ऐतिहासीक क्षण आहे, ज्यामुळे देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाला भाजपाच्या विचारधारेशी जोडण्याची संधी मिळेल, असे प्रसंगी आमदार अमोल जावळे म्हणाले.