हॉटेल लॉजमध्ये वेश्याव्यवसाय ; एमआयडीसी पोलिसांच्या छाप्यात दोन आंबटशौकीन ताब्यात ; सहा महिलांची सुटका ;

जळगाव – जळगावच्या एमआयडीसी सी सेक्टरमधील हॉटेल सागर लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकला. यात सहा महिलांची सुटका करण्यात आली तर दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी भागात जी सेक्टरमधील सागर लॉजवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाला मिळल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. सोमवारी पोलिसांच्या पथकाने दुपारी चार वाजता लॉजवर छापा टाकत सहा महिलांसह दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने अवैध व्यवसाय करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली.