तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथे संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन..


मावळ : तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार (दि. 22) रोजी सोहळ्याला प्रारंभ होणार असून रविवार (दि. 29) रोजी काल्याच्या कीर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.


मार्गशीर्ष वद्य सप्तमी व मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी रविवार (दि22) रोजी सुदुंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल कालिदास गाडे, उपसरपंच बापूसाहेब बोरकर आणि सदस्यांच्या हस्ते संताजी महाराजांची पूजा आणि अभिषेक होणार आहे. त्यानंतर सप्ताहभर काकड आरती, महापुजा, अभिषेक, गाथा पारायण, प्रवचन, हरीपाठ, कीर्तन, जागर सुरु राहणार आहे. मंगळवारी (दि. 28) रोजी श्री क्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, देहुगाव यांचे किर्तन आणि ( दि. 29) रोजी दिगंबर महाराज राऊत (माऊली) पेण रायगड यांच्या सुश्राव्य वाणीने काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे. सप्ताहभर सोहळ्यात काकड आरती, महापुजा, अभिषेक, गाथा पारायण, प्रवचन, हरीपाठ, कीर्तन, जागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास राज्यभरातून मोठ्या संख्येने तेली बांधव आणि भक्त परिवार सुदुंबरे येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे शिवदास उबाळे अध्यक्ष यांनी दिली.

सोहळ्याची जय्यत तयारी : समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन

दरम्यान श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास मनोहर उबाळे, श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचे अध्यक्ष नारायण दिगंबर क्षिरसागर, विजय शंकरराव रत्नपारखी (कार्याध्यक्ष), पोपटराव किसन पिंगळे (उपाध्यक्ष), विजयकुमार लक्ष्मण शिंदे (उपाध्यक्ष), अॅड. राजेश केशव येवले (मुख्यचिटणीस), दत्तात्रय रंगनाथ शेलार (खजिनदार), पंडीत सदाशिव पिंगळे (चिटणीस शिक्षण समिती), भिकाजी केशव भोज ( अंतर्गत हिशोब (तपासणीस), लक्ष्मण गेणभाऊ शेलार (चिटणीस), विजय किसन रत्नपाररखी (सह खजिनदार), प्रशांत चंद्रकांत भागवत
(चिटणीस), सतिश भालचंद्र वैरागी (चिटणीस), शैलेश सहदेव मखामले (चिटणीस), विमल सतिश वाव्हळ (महिला चिटणीस), श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचे गंगाधर काशीनाथ हाडके (उपाध्यक्ष), अरविंद रामचंद्र रत्नपारखी (सचिव), मनोहर माधवराव जाधव (खजिनदार), ताराचंद हरिभाऊ देवराय (मा. सचिव) श्रीमती. बनारसी धोंडिबा राऊत ( विश्वस्त), लक्ष्मण गेणभाऊ शेलार (विश्वस्त), अरुण कोंडिबा काळे (मा. अध्यक्ष), कोंडिबा गणपत दिवेकर (विश्वस्त), विश्वास हरिभाऊ डोंगरे ( विश्वस्त), प्रदिप पुरुषोत्तम वाव्हळ (विश्वस्त), बाळासाहेब नथोबा बाळुंजकर ( विश्वस्त), शंकर केशव काळे (विश्वस्त), जयश्री सुरेश राऊत (विश्वस्त), उल्हास पांडुरंग वालझाडे (विश्वस्त), श्री संत संताजी महाराज जगनाडे उत्सवाचे अध्यक्ष नरेंद्र रघुनाथ मेहेर आकुर्डी पुणे, उत्सव उद्घाटक राजेश विश्वास डोंगरे, चिखली पुणे, मंदिर व्यवस्थापक चंद्रकांत जाधव आदींच्या सहभागातून या सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. भाविक भक्तांनी उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.