परभणी घटनेच्या निषेधार्थ भुसावळात उद्या मूकमोर्चाचे ‘आयोजन ;


भुसावळ – परभणी येथील संविधान शिल्पकृती विटंबना प्रकरण तसेच पोलीस कस्टडीत आंदोलनकर्ते भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ येथील कृती समिती,भुसावळ. तर्फे २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी (प्रांत ) कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात येणार आहे .

मूकमोर्चात सहभागी होणाऱ्या तमाम संविधानप्रेमी आंबेडकरवादी,भीमसैनिकांनी बैठकीत बहुमताने निश्चित झालेल्या पुढील नियमांचे काटेकोर पालन करायचे असल्याचे ठरले आहे .

मोर्चा वेळेवर सुरू होईल. मोर्चा सकल बौद्ध समाज, संविधानप्रेमी,आंबेडकरवादी तमाम भीमसैनिकांच्या वतीने आयोजित असल्याने कुठल्याही पक्ष संघटनेचे ध्वज अथवा फलक सोबत आणू नये मोर्चाचे शीर्षक “मूकमोर्चा” असल्याने मोर्चात कुठल्याही निषेधाच्या घोषणा देऊ नये अथवा वादग्रस्त विधाने करू नये मोर्चात सहभागी होणाऱ्यांना काळ्याफिती तसेच तिरंगा ध्वज,निळे ध्वज,घोषणांचे फलक देण्यात येतील. मोर्चा सहभागी होणाऱ्या नेतेगण,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोर्चाच्या अग्रभागी न राहता, मोर्चा यशस्वी करण्यासाठी स्वतः स्वयंसेवकाची भूमिका अदा करावी. मोर्चाचे नेतृत्व कुठलीही पक्ष संघटना अथवा नेता करणार नसून सकल बौद्ध समाज संविधानप्रेमी,आंबेडकरवादी तमाम भीमसैनिक मोर्चाचे नेतृत्व करतील. मोर्चात सहभागी होताना आपल्या सभोवताली घडणाऱ्या चुकीच्या घटनांचे निरीक्षण करून कृती समितीस त्वरित कळवावे जेणेकरून मोर्चास गालबोट लागणार नाही. मोर्चा समाप्तीनंतर मोर्चात सहभागी सर्वांनी कुठल्याही अनुचित प्रकारास बळी पडू नये .

तरी या मूक निषेध मोर्चात तमाम संविधानप्रेमी आंबेडकरवादी,भीमसैनिकांनी , व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समिती,भुसावळ.च्या वतीने करण्यात आले आहे .