मध्य रेल्वेच्या सहा एक्सप्रेस गाड्या १ जानेवारीपासून नॉन-सुपरफास्ट धावणार; गाडी क्रमांकातही बदल!भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांचाही समावेश; प्रवाशांनी सुधारित क्रमांकांची नोंद घेण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ जानेवारी २०२७ पासून निवडक गाड्यांच्या दर्जात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या सुपरफास्ट श्रेणीत धावणाऱ्या काही गाड्या यापुढे नॉन-सुपरफास्ट म्हणून धावणार आहेत. या बदलासोबतच संबंधित गाड्यांच्या क्रमांकातही बदल करण्यात आले आहेत. भुसावळ विभागातून धावणाऱ्या सहा महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे.

सुधारित गाडी क्रमांक पुढीलप्रमाणे :

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस

- विद्यमान क्रमांक १२०७१ ऐवजी नवीन क्रमांक ११०६९.
- हिंगोली–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेसचा क्रमांक १२०७२ ऐवजी ११०७०.

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–बनारस महानगरी एक्सप्रेस

- विद्यमान क्रमांक २२१७७ ऐवजी नवीन क्रमांक ११०९३.
- बनारस–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेसचा क्रमांक २२१७८ ऐवजी ११०९४.

३) लोकमान्य टिळक टर्मिनस–अयोध्या कॅंट तुलसी एक्सप्रेस

- विद्यमान क्रमांक २२१२९ ऐवजी नवीन क्रमांक ११०६५.
- अयोध्या कॅंट–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसचा क्रमांक २२१३० ऐवजी ११०६६.

४) लोकमान्य टिळक टर्मिनस–बनारस एक्सप्रेस

- विद्यमान क्रमांक १२१६७ ऐवजी नवीन क्रमांक ११०६७.
- बनारस–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसचा क्रमांक १२१६८ ऐवजी ११०६८.

५) पुणे–काजीपेट एक्सप्रेस

- विद्यमान क्रमांक २२१५१ ऐवजी नवीन क्रमांक ११४३७.
- काजीपेट–पुणे एक्सप्रेसचा क्रमांक २२१५२ ऐवजी ११४३८.

६) वास्को दि गामा–हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस

- विद्यमान क्रमांक १२७७९ ऐवजी नवीन क्रमांक १७३७९.
- हजरत निजामुद्दीन–वास्को दि गामा गोवा एक्सप्रेसचा क्रमांक १२७८० ऐवजी १७३८०.

१ जानेवारी २०२७ पासून बदल लागू

वरील सर्व बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार असून संबंधित गाड्या यापुढे नॉन-सुपरफास्ट श्रेणीत चालवण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासाचे नियोजन करताना जुन्या गाडी क्रमांकाऐवजी नवीन क्रमांकांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तिकीट आरक्षण, गाड्यांचे वेळापत्रक आणि प्रवासासंबंधी अद्ययावत माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा अधिकृत माहिती प्रणालीचा वापर करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.