भुसावळ – मतदाना वेळी शहरातील 179 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर आरोग्य विभागाने तपासणी पथक नियुक्त केले होते . यावेळी चक्कर येणे अशक्तपणा, रक्तदाब कमी जास्त होण्याचा त्रास असलेल्या मतदारांवर प्रथम उपचार करण्यात आले . डॉ तौसीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने ही सेवा दिली

मतदान दरम्यान अनेक मतदार नागरिकांनी या आरोग्य सेवा सुविधेचा लाभ घेतला यावेळी तपासणी नंतर त्यांना ओ आर एस पावडर , रक्तदाबावर , थंडी ताप , हात पाय दुखणे आदी व्याधीवर गोळ्या देण्यात आल्या . तर अनेक मतदार रुग्णांचा रक्तदाब तपासण्यात आला


