भुसावळ (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेने आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस - हटिया दरम्यान उत्सव विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे: लोकमान्य टिळक टर्मिनस - हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाड्या (६ सेवा) गाडी क्रमांक 08610: साप्ताहिक विशेष गाडी, दिनांक १३.१०.२०२६ ते २७.१०.२०२६ या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.५५ वाजता सुटेल आणि हटिया येथे तिसऱ्या दिवशी ०४.३० वाजता पोहोचेल. (३ सेवा) गाडी क्रमांक 08609: साप्ताहिक विशेष गाडी, दिनांक १२.१०.२०२६ ते २६.१०.२०२६ या कालावधीत दर सोमवारी हटिया येथून १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २१.५० वाजता पोहोचेल. (३ सेवा) थांबे -: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, बानो, गोबिंदपुर रोड आणि बालसीरिंग. गाडीची संरचना: १ वातानुकूलित प्रथम / द्वितीय श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय, ७ वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय असनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन. तिकीट आरक्षणासाठी प्रवासी 'रेलवन' ॲपचाही वापर करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा.


