भुसावळ विधानसभेत विजय निश्चित : आमदार संजय सावकारे –

भुसावळ – गेल्या तीन टर्मपासून भुसावळसह ग्रामीण भागातील जनतेचे प्रेम आपल्याला मिळत आले आहे व यावेळेस देखील मतदारांचा आपल्याला मतदानरुपी आशीर्वाद लाभला असून निश्चितच विजय आपलाच होईल यात कुठलीही शंका नाही, असा ठाम विश्वास आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला .

जनतेने यावेळी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून मतदान केल्याने यंदा मतदानाचा टक्का वाढल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार संजय सावकारे यांनी आपल्या कुटूंबासह बुधवार, 20 रोजी शहरात मतदानाचा हक्क बजावला. आमदार सावकारे यांनी पत्नी रजनी सावकारे, आई सुशीलाबाई सावकारे, मुलगा युगांक सावकारे सह संत गाडगेबाबा शाळेत मतदानाचा हक्क बजावला.