भुसावळ – भुसावळ मतदारांमध्ये जनजागृती व्हावी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी साकेगाव येथील युवकांनी एक रॅली काढण्यात आली होती या रॅलीत महिला पुरुष , यांचेसह व नागरिक सहभागी झाले होते रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते . भुसावळ मतदार संघातील 318 मतदान केंद्रावर मतदान झाले काही भागात सकाळी संथ गतीने मतदान झाले मात्र दुपार नंतर चांगलीच गर्दी उसळली होती . भुसावळ मतदार संघात एकूण 57. 63 टक्के मतदान झाले . साकेगावात सकाळ पासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता सहाक्रमाक बूथवर मोठया प्रमाणात रांगा लागल्या होत्या .



