जनजातीय गौरव दिवसानिमित्त भुसावळ रेल्वे विभागात कार्यक्रम : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धेचे आयोजन :

भुसावळ – भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्यासाठी भुसावळ मंडलात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 15 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होऊन 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालू राहील.

याचाच एक भाग म्हणून आज, 18 नोव्हेंबर 2024 रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर भाषण स्पर्धेचे आयोजन मध्य रेल्वे शाळा, भुसावळ येथे करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्ष, बलिदान आणि त्यांच्या योगदानावर आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे प्राचार्य आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.