मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज ; भुसावळ मतदार संघामध्ये 318 मतदान केंद्र ; १५७ मतदान केंद्रावर बेव कास्टींग : ड्रोनचीही करडी नजर :

भुसावळ – भुसावळ:-विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे. १५७ मतदान केंद्रावर बेव कास्टींग सुविधे अंतर्गत सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येणार आहे. व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. यंत्रणा सज्ज असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांची देखील करडी नजर राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी कार्यालय येथे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्थेच्या अबाधित राहावी याकरिता बाजारपेठ, शहर, तालुका हद्दीमध्ये वेळोवेळी रूट मार्च घेण्यात आलेला आहे. याशिवाय ड्रोनची ही करडी नजर मतदानाच्या दिवशी राहणार आहे.मतदार संघात तासानुसार अपडेट निवडणूक कार्यालयाकडून घेण्यात येत आहे.

आदर्श मतदान केंद्राची स्थापना

भुसावळ मतदार संघामध्ये तब्बल 318 मतदार केंद्र असून यात 11 आदर्श मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. यापैकी तीन मतदान केंद्र हे पिंक /सखी बूथ राहतील अर्थात येथे महिला कर्मचारी कामकाज पाहतील यात कोटेचा महाविद्यालय, एन.के नारखेडे शाळा (पत्रीशाळा) याशिवाय गोजोरो येथील जिल्हा परिषदेची शाळेचा समावेश आहे. दिव्यांग मतदारांसाठी पुडलीक ब-हाटे व पालिकेची शाळा क्रमांक 35 स्वतंत्र केंद्र असतील तर युवा अर्थात 25 वयोगटाच्याआतील असलेले युवा मतदान केंद्र के.नारखेडे विद्यालय असेल. ग्रामीण भागात भानखेडा जि प शाळा ,जाडगाव, टहाकळी, किन्ही व आदर्श हायस्कूल यांचा आदर्श मतदान केंद्र मध्ये समावेश आहे.

उद्या होणार साहित्य वाटप

जळगाव रोड वरील तहसील कार्यालयाच्या मागील परिसरामध्ये 19 रोजी मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून मतदान साहित्य वाटप होणार आहे हे साहित्य घेऊन १७५५ कर्मचारी ३१८ मतदान केंद्रावर रवाना होतील त्यासाठी १९ बसेस ११० खाजगी वाहनाची व्यवस्था केली आहे. दरम्यान साहित्य घेऊन निघालेल्या कर्मचाऱ्यांची अचूक लोकेशन करण्यासाठी यंदा प्रथमच चक्रीका ॲप्सचा उपयोग होईल ते अँप कर्मचाऱ्यांनी मोबाईल मध्ये डाउनलोड केले आहे.
साहित्य वाटपाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही अडचणी येऊ नये याकरिता तब्बल २६ टेबल लावण्यात आलेले आहे.तसेच ३६ सेक्टर ऑफिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मशीनमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास दोन अभियंता देखील नियुक्त करण्यात आलेले आहे

पोलीस प्रशासनाची करडी नजर
मतदानाच्या दरम्यान
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशांत प्रशासन सज्ज असून फिरते पथक देखील मतदान केंद्रावर भेटी देणार आहे तसेच१५७ मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कास्टिंग होणार आहे .तर १६१ मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्जरवर तैनात राहतील शंभर मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त राहणार असून करडी नजर राहणार आहे.

वयोवृद्ध व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा

मतदाना दरम्यान लांब रांगेत दिव्यांग वयोवृद्ध व महिलां यांना कोणत्याही असुविधा होऊ नये याकरिता दिव्यांग वयोवृद्ध व गरोदर महिलांसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून स्त्रियांच्या व दिव्यांगा यांच्या वेगळ्या रांगा लागतील. तसेच शहरी भागामध्ये ५५ तर ग्रामीण भागामध्ये ५७ विल चेअर ची व्यवस्था करण्यात आलेली आहे