पुरी अहमदाबाद गाडीत बारा किलो बेवारस गांजा जप्त :

भुसावळ – पुरी अहमदाबाद एक्सप्रेसच्या बी3 या डब्यातील बर्थ क्रमांक ७च्या खाली बेवारस बॅग मध्ये १२ किलो गांजा सापडला सहा पाकिटांमध्ये हा गांजा भरला होता त्याची एकूण किंमत एक लाख वीस रुपये आहे पंधरा नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता हे कारवाई झाली शुक्रवारी रात्री पुरिया अहमदाबाद एक्सप्रेस ने मलकापूर स्थानक सोडले या गाडीच्या बी 2 कोच मधील बर्थ क्रमांक सात च्या खाली बेवारस बॅग पडून असल्याची माहिती तिकीट निरीक्षक ललित बाबुराव मेश्राम राहणार नागपूर यांना आठ वाजता मिळाली नंतर आरपीएफ आयुक्तांच्या सूचनेवरून आरपीएफ निरीक्षक मीना यांनी रात्री नऊ वाजता गाडी भुसावळ स्थानकावरील फलाट क्रमांक दोन वर येतात पंचा समक्ष बेवारस बॅग ताब्यात घेतली आरपीएफ कार्यालयात आणून सीसीटीव्ही कॅमेरा समक्ष ही बॅग उघडली असता त्यात सहा पाकिटे मिळाली या पाकिटांमध्ये बारा किलो गांजा होता आरपीएफ यांनी हा गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांकडे सोपविला दहा हजार रुपये किलो दराप्रमाणे त्याचे मूल्य एक लाख वीस हजार रुपये सांगण्यात आले .