भुसावळ – विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना प्रत्येक मतदाराला स्वतःची ओळख द्यावी लागेल त्यासाठी मतदान ओळखपत्राखेरीज 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहे मतदार चिठ्ठी हा पुरावा ग्राह्य मानला जाणार नाही असे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले

येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे त्यात मतदारांना आपल्या मतदान केंद्राचे माहिती मिळावी म्हणून बीएलओतर्फे मतदार चिट्ठी घरपोच दिली जात आहे याचिट्ठीत मतदाराचे नाव , मतदान केंद्र क्रमांक , व छायाचित्रां चा समावेश आहे दरम्यान मतदारांची ओळख पटवण्यासाठी आयोगाने 12 कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे सूचित केले आहे या आदेशाचे पत्र 16 ऑगस्टला सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठविले आहे मतदान करण्यासाठी केंद्रात केंद्रावर जाणाऱ्या मतदाराने या 16 पैकी एक ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत न्यावे असे प्रांत निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले
मतदानाला जाताना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड , मनरेगा योजना ओळखपत्र बँक किंवा टपालातील फोटो असलेले पासबुक पासपोर्ट वाहन चालन परवाना पॅन कार्ड भारतीय महा निबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्तीवेतनाचे दस्तावेज सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यानी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र खासदार व आमदारांचे अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांगांना दिलेले विशेष ओळखपत्र अनिवासी भारतीयांना ओळख पटवण्यासाठी मूळ पासपोर्ट ओळखीसाठी वापरता येईल


