भुसावळ – शहरासह मतदारसंघात गेल्या तीन टर्ममध्ये अनेक विकासकामे करण्यात आली असून आगामी काळात मतदारांनी पुन्हा संधी दिल्यास उर्वरीत कामे निश्चितपणे पूर्ण करू, असे आश्वासन आमदार संजय सावकारे यांनी येथे दिली. शहरातील वरणगाव रोडवरील सुंदर नगरात 14 रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांची कॉर्नर सभा झाली. यावेळी पदाधिकार्यांनी आमदार संजय सावकारे यांना शहर विकासााठी निवडून देण्याचे आवाहन केले.
आमदार संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, मोंटू अग्रवाल, राहुल तायडे, रवींद्र नाना पाटील, अतुल चव्हाण, खुशाल जोशी यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



