राष्ट्रहितासाठी मतदान करा – श्री कन्हैयालाल महाराज शेंदुर्णीकर ;

भुसावळ ,- भुसावळ येथे झालेल्या संत संमेलनात नागरिकांनी राष्ट्र हितासाठी शंभर टक्के मतदान करा असे आवाहन श्री कन्हैयालाल महाराज शेंदुर्णीकर यांनी केले. पुढे ते म्हणाले या आधी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील अनेक राजे महाराजांनी देखील संत महंतांचे मार्गदर्शन घेऊन राज्यकारभार चालवला आहे बटेंगे तो कटेंगे, घटेंगे तो भी कटेंगे , विचार करा व .हिंदू धर्म हिंदू राष्ट्र वाचविण्यासाठी सर्वांनी मतदान अवश्य करा असेही श्री कन्हैयालाल महाराज शेंदुर्णीकर यांनी आव्हान केले .

जामनेर रोड येथे आयोजित या संमेलनास या वेळी मंचा वर श्री महंत कोठारी स्वामी,श्री बाबा सुनील उदासी, ह भ प लक्ष्मण महाराज ह भ प गीता दास चंद्रकांत, महाराज,ह भ प बापजी कांतीलाल जी महाराज, श्री पंडित रामनारायण शास्त्रीजी, ब्रह्माकुमार अनिलजी, श्री आत्मा रामानंद जी वृंदावन हे उपस्थित होते.


या कार्यक्रमाला परिसरातील स्त्री पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.
सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सूत्रसंचालन :श्री काशीराम बारेला, प्रास्ताविक नाना खांडवेकर, आभार उमेश जाधव यांनी मानले.