वरणगाव येथील श्री मॉल व श्री किराणा दुकानाचे मालकास त्वरित अटक करण्यात यावी : भटक्या विमुक्त आदिवासी वंचित महिला आघाडीची मागणी ; विविध संघटना आक्रमक

वरणगाव – ५० वर्षीय नरधमा कडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा वरणगाव येथील श्री मॉल व श्री किराणा दुकानाचे मालक याला त्वरित अटक करण्यात यावा. व अन्य मागण्या साठी भटक्या विमुक्त आदिवासी वंचित महिला आघाडी संघटना आक्रमक.झाल्या असून

वरणगाव येथील अल्पवयीन मुलीचे विनयभंग प्रकरणी श्री मॉल व श्री किराणा दुकानाचे मालक राजेंद्र जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा अद्याप पर्यंत अटक न करण्यात आली नसल्यामुळे उद्या दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता वरणगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन भटक्या विमुक्त वंचित आदिवासी महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या मार्फत त्वरित अटक करण्यात यावे आणि निषेध सभा आणि वरणगाव शहरात मोर्चा या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्वपक्षीय,सामाजिक महिला संघटना, जागृत महिला यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असेआवाहन आदिवासी महिला आघाडी प्रमुख अनिता पवार, भटक्या विमुक्त वंचित महिला आघाडी प्रमुख सोनिया लोंढे, नलिनी जाधव, ताराबाई गायकवाड, सुरेखा गायकवाड आदी महिला आघाडी प्रमुख यांनी केली आहे.