भुसावळ- भुसावळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ( उबाठा ), राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ), आणि राष्ट्रीय काँग्रेंस महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेश मानवतकर यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भुसावळ विधान सभा मतदार संघाचे निवडणूक निर्णायक अधिकारी जितेंद्र पाटिल यांच्याकडे शेवटच्या दिवशी मंगळवार २९ रोजी दाखल केला. यावेळी भुसावळ शहरांच्या विविध भागांतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
महा विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेश मानवतकर यांना पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २९ रोजी अखेरचा दिवस असल्याने डॉ. मानवतकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला अर्ज दाखल केला आहे. एकीकडे ढोल ताशांचा गजरात डॉ. राजेश मानवतकर यांची शहरातील डॉ विविध भागांमधुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सामील झाले होते. महाविकास आघाडी अभेद्य आहे, बंडखोरी होणार नाही. आणि जास्त काळ कोणी नाराजसुध्दा राहणार नाही. असा विश्वास डॉक्टर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केला.
यावेळी डॉ. मानवतकर यांच्यासह राजेंद्र विश्वनाथ चौधरी, दिपक मराठे, तसेच शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते ,समर्थक मोठया संख्येने उपस्थीत होते.



