भुसावळला भारतीय बौध्द महासभेचे “महिला जिल्हा कार्यकर्ता शिबिर” संपन्न

भुसावळ :- येथील शीलरत्न बुध्द विहारात सोमवारी रोजी शेकडो महीला कार्यकर्त्या च्या उपस्थितीत संपन्न झाले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष प्रियंकताई अहिरे, प्रमुख मार्गदर्शिका राज्य उपाध्यक्ष संस्कार विभागाच्या स्वाती गायकवाड तर शिबीराचे उद्घघाटक राज्य संघटक लताताई तायडे यांनी केले व प्रमुख उपास्थित मध्ये जिल्हा कोषाध्यक्ष शैलेन्द्र जाधव, जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सरदार, जिल्हा उपाध्यक्ष सुमित्रा सर्वटकर, जिल्हा उपाध्यक्ष समता सैनिक दल मेजर रमेश साळवे, जिल्हा संघटक वनमालाताई हिवाळे, जिल्हा सचिव समता सैनिक दल मेजर अनिल वानखेडे, समता सैनिक दलाचे साचिव वानिताताई साळवे, हे होते.


कार्यक्रम ची सुरूवात महापुरुषांना पुष्पमाला टाकून वंदन करण्यात आले त्यानंतर त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली.
शिबिरात जिल्हयातील सर्व तालुका, शहर, ग्राम शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थिती होत्या. कार्यक्रमांचे सुत्र संचलन व आभार वैशालीताई सरदार यांनी केले.