भुसावळ : येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकत्याच रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये हाऊस प्रमाणे घेण्यात आली. यामध्ये दोन गट करण्यात आले. प्रथम गट पाचवी ते सातवी आणि दुसरा गट आठवी ते दहावी.
प्रत्येक गटात सहा विद्यार्थिनिंनी सहभाग घेतला होता. रांगोळीचे विषय – नारीशक्ती , दिवाळी ,कोजागिरी या विषयावर सुंदर आकर्षित रांगोळ्या विद्यार्थिनींनी काढल्या.


चार हाऊस मधून प्रथम ,द्वितीय , तृतीय क्रमांक काढण्यात आले. रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून भारती राठी व राखी भराडीया यांनी काम पाहिले. ताप्ती स्कूलच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी विद्यार्थीनींनी काढलेल्या रांगोळीचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच ताप्ती स्कुलच्या व्हाईस प्रिंसीपल श्रद्दाली घुले,मनप्रीत कौर व शिक्षक नितीन अडकमोल,मुकेश कोळी,अर्जुन सणस ,राहुल सोनवणे यांनी सहकार्य केले.
फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनींनी काढलेल्या रांगोळ्या.



