दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन वंचितांचे तोंड गोड करा : भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे यंदा नववे वर्ष

भुसावळ (प्रतिनिधी )

भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या वस्त्यात दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.दात्यांकडून वाटी वाटी फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नविन कपडे, नवीन चपला, बूट आणि शालेय साहित्य, किराणा गोळा करायचे. गरजू वस्त्या शोधायच्या आणि त्याठिकाणी दिवाळी साजरी करायची असा हा उपक्रम आहे.यंदा उपक्रमाचे नववे वर्ष आहे.

समाजाचे आपण काही देण लागतो या भावनेतून अंतर्नाद प्रतिष्ठानने सन २०१६ मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.पहिल्या वर्षी चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी, दुसऱ्या वर्षी जोगलखोरी व रावेर तालुक्यातील जुनी मोहमांडली येथे, तिसऱ्या वर्षी सातपुड्यातील काळाडोह, मोर धरण, विटवा या वस्तीवर तर चवथ्या वर्षी वड्री धरणाजवळील आसराबारी, पाचव्या वर्षी जामुन झिरा, सहाव्या वर्षी डोंगरदे, सातव्या वर्षी गायरान, आठव्या वर्षी नागदेवी या आदिवासी वस्तीवर हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यातील लसणीबर्डी आदिवासी पाड्यावर ३० ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

शहरवासीयान कडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यंदा व्यापक स्वरूप देण्याचा मानस प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी व्यक्त केला आहे .ज्यांना शक्य नसेल पण देण्याच सुख अनुभवायच असेल त्यांनी नविन कपडे, जुने कपडे स्वच्छ धुवुन व इस्त्री करुन द्यावे.फराळ द्यायचा असेल तर उपक्रम समितीशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख अमित चौधरी, समन्वयक समाधान जाधव,सह समन्वयक विक्रांत चौधरी, सह समन्वयक तेजेंद्र महाजन यांनी केले आहे.

शहरवासीयांकडून मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, यंदा या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा मानस अंतर्नाद प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केला आहे. ज्यांना प्रत्यक्ष सहभाग घेणे शक्य नसेल, परंतु देण्याचे समाधान अनुभवायचे असेल, त्यांनी नवीन कपडे किंवा स्वच्छ धुतलेले व इस्त्री केलेले जुने कपडे दान करावेत. फराळ, शैक्षणिक साहित्य द्यायचे असल्यास, कृपया उपक्रम समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख अमित चौधरी, समन्वयक समाधान जाधव, सहसमन्वयक विक्रांत चौधरी आणि तेजेंद्र महाजन यांनी केले आहे.

उपक्रमासाठी समिती
ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, अमितकुमार पाटील, जीवन महाजन, डॉ.संजू भटकर, प्रसन्ना बोरोले, कुंदन वायकोळे, हितेंद्र नेमाडे, ललित महाजन, राजू वारके, भूषण झोपे, देव सरकटे, प्रा.डॉ.शामकुमार दुसाने, शैलेंद्र महाजन, राहुल भारंबे, उमेश फिरके, विपीन वारके, चंद्रकांत सूर्यवंशी, हरीश भट, जीवन सपकाळे, सचिन पाटील, निवृत्ती पाटील, प्रमोद पाटील, राजेंद्र जावळे, मंगेश भावे, केतन महाजन, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील परिश्रम घेत आहेत.

नवे जुने कपडे गोळा करणार
गेल्या वर्षी या उपक्रमात फराळासह नवे आणि जुने कपडे गोळा करण्यात आले होते,ते जवळपास ४५० व्यक्तीना वाटप करण्यात आले होते.सोबतच फराळ, नविन चपला, शालेय साहित्य, साखर, तांदूळ सुद्धा वाटला होता. यंदा उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे.ज्यांच्याकडे जुने पण चांगल्या स्थितीतील शालेय दप्तर, स्वेटर , ब्लॅकेट असतील ते आणि इतर मदत प्रतिष्ठानच्या उपक्रम समितीकडे २६ ऑक्टोबर पर्यंत द्यावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख अमित चौधरी यांनी केले आहे.