भुसावळातील महिला धावपटूंनी नऊ किमी धावून दिला भक्तिमार्ग व आरोग्याचा संदेश :

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या महिला धावपटूंनी दिनांक १० गुरुवार रोजी नवरात्री उत्सवाचा गुलाबी रंग होता म्हणून गुलाबी रंगाचा टी शर्ट परिधान करून भक्तिमार्ग व आरोग्य याचा संदेश आपल्या ९ किमी धावण्यातून दिला.

याप्रसंगी डॉ नीलिमा नेहेते, डॉ चारुलता पाटील, स्वाती फालक, ममता ठाकूर,डॉ वर्षा वाडिले, विनिता शुक्ला, किर्ती मोटाळकर, गरिमा न्याती, पिंकी सिंग,मनीषा सिंग,सुनीता रंजन सिंग, सीमा वायकर,प्रीती पांडा,निशा घुले, पुष्पा तिवारी, एकता भगत,सुनीता वाघमारे,शीला कश्यप,पुष्पलता चौधरी या महिला धावपटूंनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य महिला धावपटू नवरात्रीचे ९ दिवस दररोज ९ किमी धावल्या आहेत व यातून भक्तिमार्ग व आरोग्य धनसंपदा हा संदेश दिला आहे .