भुसावळ – महिलांच्या योनीमार्गातील अनेक समस्यांसाठी लेजर उपचारपद्धती ही अत्यंत प्रभावशाली व आधुनिक वरदान आहे महिलांना योनी मार्गातील समस्या असतात तेव्हा यापद्धतीमुळे योग्य उपचार होण्यासाठी येथील अर्पण हॉस्पिटल येथे कॉस्मेटिक् गायनेकॉलॉजी/ लेझर सेंटर चे उद्घाटन प्रतिष्ठा माहेला मंडळ अध्यक्षा सौ रजनीताई सावकारे, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भुसावळ शहरातील हे पहिलेच सेंटर आहे. तसेच या दिवशी अर्पण मेडिकल स्टोरचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले.


या प्रसंगी सौ रजनीताई सावकारे, डॉ शास्त्री ,डॉ भाग्यश्री भंगाळे, डॉ दिप्ती पाटील, डॉ राहुल पाटील, डॉ रंजना शिंगणे, पारुल वर्मा, सक्षम नारी फाउंडेशनच्या सदस्या व अर्पण हॉस्पिटल परिवार उपस्थित होता. ही अद्ययावत उपचारपद्धती भुसावळ मध्ये प्रथमच आणल्याने डॉ सुवर्णा गाडेकर (सोनार) व डॉ. विक्रांत सांनार यांचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. या नवीन लेझर उपचारपद्धतीचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ सुवर्णा गाडेकर ह्यांनी केले आहे. सध्या असे उपचार फक्त मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातच होत आहेत. हे सर्व उपचार कमीतकमी खर्चात अर्थात अत्यल्प फी मध्ये करून देण्याची ग्वाही डॉ सुवर्णा गाडेकर ह्यांनी यावेळी दिली.


