भुसावळ – अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मिडीया विभागाच्या अध्यक्षा श्रीमती सुप्रिया श्रीनेत यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडीया विभागाच्या भुसावळ विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष पदी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा चिटणीस विवेक नरवाडे यांची निवड करण्यात आली.
यावेळेस जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार, खासदार चंद्रकांत हंडोरे, आ.शिरीषदादा चौधरी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष
विजूभाऊ अंभोरे,.योगेंद्र पाटील,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, प्रशासन जिल्हा सरचिटणीस जमील शेख,ज्ञानेश्वर कोळी, भुसावळ तालुकाध्यक्ष शैलेश बोदोडे, शहराध्यक्ष रवि निकम,वरणगांव शहराध्यक्ष अश्पाक काझी,डाॅ.सुवर्णा गाडेकर,भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर जंजाळे, ज्ञानेश्वर चव्हाण,भगवान मेढे आदींनी अभिनंदन केले.




