मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस-२०२४ साठी विशेष गाड्या चालवणार

भुसावळ –

मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस- २०२४ निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन सोलापूर आणि नागपूर आणि, नागपूर -पुणे , नागपुर -अकोला आणि अकोला -अमरावती दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत.

१) सोलापूर -नागपूर विशेष
०१०२९ विशेष गाडी दिनांक ११.१०.२०२४ रोजी सोलापूर येथून १८.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता नागपूर येथे पोहचेल.
थांबे – कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, चांदुर, धामणगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम,सिंदी ,अजनी.
संरचना: २ वातानुकूलित तृतीय श्रेणी , ८ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह

२) नागपुर -पुणे विशेष
०१०३० विशेष गाडी दि. १३.१०.२०२४ रोजी नागपूर येथून १६.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७.२० वाजता पोहोचेल.
थांबे: सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, वाशीम, हिंगोली डेक्कन, पूर्णा , परभणी, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, दौंड आणि पुणे .
संरचना: २ वातानुकूलित तृतीय श्रेणी , ८ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह

३) नागपूर -अकोला अनारक्षित विशेष
०११३२ विशेष दि. १३.१०.२०२४ रोजी नागपूर येथून ११.३५ वाजता सुटेल आणि अकोला येथे त्याच दिवशी १६.०० वाजता पोहोचेल.
थांबे: बुटीबोरी,सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला
संरचना: ८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह

४) अकोला -अमरावती अनारक्षित विशेष
०११३१ विशेष दि. १३.१०.२०२४ रोजी अकोला येथून १७.०० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १८.३० वाजता पोहोचेल.
थांबे -: मूर्तिजापूर, बडनेरा
संरचना: ८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.