भुसावळात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी


भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग व राजीव गांधी वाचनालय व कॉग्रेंस पार्टी तर्फे नसरवांजी फाईल राजीव गांधी वाचनालय येथे दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्र पिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली .

यावेळी प्रथम मो मुनव्वर खान प्रदेश उपाध्यक्ष व वाचनालय चे अध्यक्ष व ऍड आर टी पटेल,जेष्ठ नेते जे बी कोटेचा,यानी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभीवादन केले

यावेळी जय जवान जय किसान घोषणा देऊन मनोगत व्यक्त करता मुनव्वर खान यानी राष्ट्र पिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांचे जीवन शैली वर मनोगत व्यक्त केले . या प्रसंगी सेवादल शहर अध्यक्ष संजय खडसे महीला कॉग्रेंस शहर अध्यक्ष यास्मीन बानो, भुसावळ शहर डॉक्टर सेल शहर अध्यक्ष डॉ नईम मझहर,जिल्हा सचिव हमीद शेख, आदीवासी शहर अध्यक्ष अनवर तडवी, , जानी गवली, जकपाल सिंह गिल, सलीम गवली शमीम कुरैशी, यास्मीन कुरैशी, शिला ईदंर परदेशी, हमीदा गवली,व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते