भुसावळ —

राज्यात विधानसभेचे पडघम लागलेले असताना महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी मायक्रो ओबीसी संवाद अभियानांतर्गत सहा सप्टेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लेवा पाटीदार समाजातील विविध मंडळांचे व प्रतिष्ठित विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीं यांना त्यांच्या सागर बंगल्यावर मलबार हिल येथे ओबीसी संवाद बैठकीसाठी निमंत्रित केलेले होते. या बैठकीत महाराष्ट्रातून लेवा समाज प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते . सागर बंगल्यावर झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, इतर मागासवर्ग कल्याण मंत्रीj अतुल सावे, भाजपा महामंत्री विजय चौधरी, आमदार राजू मामा भोळे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष संजय गाते भाजपाचे रावेर पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव शिशिर जावळे ,,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भरत महाजन यांचे सह लेवा समाजातील विविध मंडळांचे अध्यक्ष प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी लेवा समाजाच्या विविध संस्था संघटनांतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांना समाजाच्या विकासासाठी व हिताच्या असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन विविध संस्था संघटनांनी त्यांना दिले. होते त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी समाजाच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या होत्या. महाराष्ट्रातून मुंबई, पुणे ,नाशिक ,रायगड भुसावळ जळगाव , मलकापूर बुलढाणा, या विविध जिल्ह्यातून परिसरातून लेवा समाज बांधवानी आपले म्हणणे यावेळी सादर केले होते व विविध मागण्यांचे निवेदन देखील दिलेले होते.. यावेळी प्रमुख मागण्यांमध्ये मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी ले वा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व समाज सभागृह निर्मिती करणे, स्थापन करणे , जामनेर तालुक्यातील वाघुर धरणास वैकुंठवासी हरिभक्त परायण संत तोताराम महाराज गाडेगावकर यांचे नाव देणे, शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज ,केळी क्लस्टर प्रोजेक्ट राबवणे, समाजातील विविध समस्यांचे निवारणासाठी समुपदेशन केंद्रांची स्थापना करणे, असोदा येथील बहिणाबाई स्मारकास वाढीव निधी उपलब्ध करून देणे, भुसावळ औद्योगिक वसाहतीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या आणणे, लेवा समाजाच्या सर्व शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्या दर्जा बहाल करणे, नॉन क्रिमिलियरची उत्पन्न मर्यादा वाढवणे तसेच ओबीसी शिष्यवृत्ती मध्ये वाढ करणे, यासह अनेक समाजाच्या हिताच्या संदर्भातल्या विविध मागण्यांची निवेदना समाज प्रतिनिधी व विविध मंडळातर्फे मान्यवरांना देण्यात आले होते. यासंदर्भात समाजाच्या सर्व मंडळांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचसह संबंधित मान्यवरांना स्मरण पत्र पाठविलेले आहे. आणि या सर्व समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय परिवार मंत्री भूपेंद्र यादव, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सातत्याने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव तथा लेवा समाजाचे युवा नेतृत्व असणारे शिशिर जावळे करीत आहेत. सहा सप्टेंबर 2024 रोजी मलबार हिल येथे झालेल्या लेवा पाटील समाजाच्या बैठकीत समाज मंडळांच्या तर्फे देण्यात आलेले समाज हिताचे सर्व मागण्या त्वरित विधानसभा निवडणूक 2024 च्या आचारसंहिते पूर्वी पूर्ण कराव्या अशी आशयाची मागणी पत्राद्वारे शिशिर जावळे यांनी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्र्यांपर्यंत केली असल्या तर त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळविलेले आहे.


