महात्मा गांधी जयंती निमित्त शिंदी प्राथमिक आरोग्य मंदिरा तर्फे स्वच्छता पंधरवाडा सुरू :


शिंदी – शिंदी, तालुका भुसावळ येथे प्राथमिक आरोग्य मंदिर किन्ही अंतर्गत शिंदी आरोग्य मंदिराच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता पंधरवड्याची एक ऑक्टोबर पासून सुरुवात करण्यात आली आहे.


ग्रामस्थांना स्वच्छता, आरोग्याच्या सोयी सुविधा आरोग्य विभागाच्या वतीने राबविले जाणारे उपक्रम यांची माहिती दिली जात आहे. जि.प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगून परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कार्याची माहिती सांगण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक भगवान बडगुजर, उपक्रमशील शिक्षक समाधान जाधव व विद्यालयातील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्त तीस वर्षावरील वयोगटातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच आवश्यकता वाटल्यास प्राथमिक प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात येत आहे. माता व बालसंगोपन, कुटुंब कल्याण कार्यक्रम, साथींचे आजार व उपचार या माहितीसह ग्रामस्थांचे आभा कार्ड काढण्यात येत असल्याचे आरोग्य मंदिराच्या वतीने सांगण्यात आले.

सरपंच सौ. सुनीता संदीप सपकाळे, उपसरपंच तथा कृउबा संचालक कैलास पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. सदर ग्रामस्वच्छता पंधरवडा यशस्वीते साठी प्राथमिक आरोग्यमंदिर शिंदीचे ग्राम समुदाय अधिकारी डॉ. निलेश जावळे, आरोग्यसेवक बालाजी कोरडे, मुख्यमंत्री युवा स्वयंरोजगार योजना प्रशिक्षणार्थी कु. दर्शना नेमाडे, अर्धवेळ परिचारिका सिंधुबाई आलोकर ,आशा स्वयंसेविका लक्ष्मी कोल्हे, अनिता पाटील स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.