ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये गांधी जयंती साजरी ;


भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पन करून अभिवादन केले. व महात्मा गांधी यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजींना आदरांजली व्यक्त करत विविध उपक्रम सादर केले. यात इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य मनप्रीत कोर,श्रद्धाली घुले,समन्वयक सोनाली मुजुमदार,एनेट मॅथ्यू,कलाशिक्षक नितीन अडकमोल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथिल ताप्ती पब्लीक सीबीएसई इंग्लीश मिडीयम स्कुल मध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करताना नीना कटलर सोबत डावीकडून एनेट मॅथ्यू ,सोनाली मुजुमदार,श्रध्दाली घुले,मनप्रीत कोर,प्रिया रायन व विद्यार्थी.