नवीन डिजिटल क्रांती अवलंबने ही काळाची गरज- केबलचे संचालक एम सलीम :

भुसावळ – केबलचा व्यवसाय हा संपलेला नाही मनातील ही शंका केबल ऑपरेटरने काढून टाकावी जोपर्यंत नवीन तंत्रज्ञानाचा वापर केबर ऑपरेटर करत नाही तोपर्यंत आपण या व्यवसायात तग धरू शकत नाही यासाठी नवीन डिजिटल क्रांती अवलंबने ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मिशियन केबलचे संचालक एम सलीम यांनी व्यक्त केले श्री सलीम हे मिशनच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त व आपल्या ओटीपीच्या उद्घाटना निमित्त बोलत होते

दि 15 ऑगष्ट 2024 भारतीय स्वातंत्र्य दिन व बीसीएन केबलचा रौप्य महोत्सव निमित्त संपुर्ण भारतातुन उरे आणि महाराष्ट्रात प्रथमच भुसावळ शहरात मध्ये बीसीएनच्या रौप्य वर्षा निमित्त बीसीएन आयपीटीव्ही आणि ओटीटी चा शुभारंभ आणि भविष्यातील केबल ऑपरेटरांचा व्यवसाय यावर संपुर्ण देशातुन आलेले केबल संघटनेचे पदाधिकारी यांनी केलेले अमोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आलेल्या मान्यवरांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

विनय राजु पाटील चेअरमन डीजीटल सव्हींस प्रोव्हायडर फेडरेशन ऑफ इंडिया आणि शिव केबल सेनेचे अध्यक्ष :- आपल्या मार्गदर्शक भाषणातुन ज्याप्रकारे राज्य व केंद्र शासन यांनी विविध समाजातील त्यांचे जिवन मान उंचविण्याकरीता महामंडळाची स्थापना विविध सरकारी बँकेतुंन सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध होणे आणि केबल ऑपरेटरांचे वत्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी यांचे भविष्य सुरक्षित राहावे या करीता महामंडळाची स्थापना करण्याकरीता शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. देशभरातील केबल ऑपरेटरांना काही अडचणी येत असतील तर फेडरेशनला संपर्क साधावा

मोहम्मद सलीम संचालक बीसीएन केबल: हे आपल्या आभार भाषणातुन बोलतांना म्हणाले की , केबल ऑपरेटर हा काही सर्वसाधारण व्यावसायीक नाही. आजचे केबल ऑपरेटर संपुर्ण भारतात आहे त्याचे प्रतिस्पर्धक जीओ, एअरटेल, अशा विविध कंपन्या आहेत. मागील 30 वर्षाच्या काळात केबल ऑपरेटरांनी जी मेहनत घेऊन आपले स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. त्यामध्ये ह्या कंपन्या आपला हिस्सा करू पाहत आहे दिवसागणीक मनोरंजनाची साधणे ही बदलत चाललेली आहे. म्हणुनच बीसीएन ने केबल ऑपरेटराचे भविष्यासाठी स्वतःचे बीसीएन आय.पी. टीव्ही आणि ओटीटीची सुरूवात केलेली आहे. जेणे करून बदलत चाललेल्या मंनोरंजनाच्या साधणात केबल ऑपरेटर मागे न राहता त्याच्या व्यवसाय पुढे सुरू राहावा यासाठी सर्व प्रथम महाराष्ट्रात बीसीएन ने उचलेले आहे. या कार्यक्रमामध्ये संपुर्ण महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथुन केबल ऑपरेटर सहभागी झालेले होते. यावेळी सर्व केबल ऑपरेटरांनी भविष्यात होत असलेल्या बदला बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन अन्सार अहमद, फाऊंडर मिडीया हेड अॅण्ड अलायंन्स केबल टिव्ही अॅण्ड ब्रॉड बैंड ऑर्गनाईझेशन भोपाल व मोहंम्मद इम्तियाज चेअरमन इस्टार केबल टिव्ही नेटवर्क व मोहन पांडे उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, राकेश कुमार सीटीआ प्रा. लि. अमोल करपे मॅनेजर अॅफिलीएट सेल्स द वेल डीझनी कंपनी, संजय वाधवा सोनी पिचर्स, सुनिल जोशी डब्ल्यु बी डिकव्हरी सेल्स एक्झीक्युटीव्ह , अनुपम शर्मा एस.पी. चोपडा कंपनी अॅण्ड ऑडीटर व विजय चंदेले जिल्हाध्यक्ष केबल चालक मालक संघटना व संघटनेचे पदाधिकारी संजय नेवे, कैलासव्यवहारे, महेश साळी, तसेच विशेष उ पस्थिती राजेंद्र आवटे नगर सेवक, कॉग्रेस आयचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुन्नवरखान, शैलेश गजऋषी स्टार कंपनी प्रतिनिधी, योगेश दुलाने झी टीव्ही कंपनी प्रतिनिधी, राजेंद्र चौधरी बीसीएन केबल डिस्ट्रीब्युटर्स, संजय विसपुते, एनएसटी नेटवर्क जळगाव, आनंद शर्मा अबतक न्युज, दिनेश टाक एकता केबल नेटवर्क अध्यक्ष, दिनेश राठोड, फाबर इंजिनिअर, तेजस पाटील नेटसरफर कंपनी, इम्रान खान मेगासॉफ्ट कंपनी, भागवत पाटील स्कायनेट कंपनी, राजकुमार शर्मा बालाजी केबल नेटवर्क, नवीन कारडा आ दित्य फायबर डिस्ट्रीब्युशन, हर्बल नारखेडे स्पीड एक्स कं पनी, यावेळी महाराष्ट्रातील व मध्य प्रदेशातील केबल ऑपरेटर व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम हा भुसावळ शहरातील मोरया हॉल मध्ये संपन्न झाला.