भुसावळातील ब्राह्मण संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप ;


भुसावळ – येथील ब्राह्मण संघाच्या शतकोत्तर संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष 1924-2024 ऑगस्ट महिन्यात पूर्ण होत आहे. संस्थेने संस्थेचा व वास्तुचा वर्धापनदिन सोहळा विद्यमान कार्यकारीणीने वर्षभर विविध प्रकारची कार्यक्रम आयोजित करून साजरा केला. या शताब्दी महोत्सवाचा समारोपानिमित्त रविवार दि. 25 रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये श्रावण मासाचे औचित्य साधून दि.25 रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत लघुरुद्राचे आयोजन तसेच 9 ते 12 या वेळात संस्थेच्या आजी,माजी पदाधिकारी व जेष्ठ नागरिक तसेच विवीध क्षेत्रातील नामवंत कार्यरत असलेल्या प्रतिथयश संपादन केलेल्या व्यक्तींचा सत्कार करून समाज बळकट करण्यासाठी पुनः एकदा नव्याने प्रयत्न करणार आहे. यासाठी ब्राह्मण संघाच्या शताब्दी महोत्सवाची सांगता सभारंभास सकल ब्राह्मण समाजाने तन, मन, धन रूपाने सहकार्य करावे, असे आवाहन ब्राह्मण संघ शताब्दी सांगता समितीने केले आहे