भुसावळ – माजी नगरसेवक तथा साहित्यीक दिलीप सुरवाडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कोणत्याही पदावर नाहीत तसेच संघटनात्मक प्रक्रियेत अथवा पक्षाशी त्यांचा कोणताही संबंध नाही, असे लेखी पत्रकाद्वारे भुसावळ तालुकाप्रमुख संतोष सोनवणे यांनी कळवले आहे.

तर पक्ष जवाबदार नाही
सोनवणे यांनी माध्यमांना दिलेल्या पत्रानुसार, सुरवाडे हे व्हॉट्सअॅप, फेसबुक व वर्तमानपत्रातून वैयक्तिकरित्या पक्षाच्या वतीने बातम्या व मत व्यक्त करतात मात्र त्यांनी व्यक्त केलेली मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मत नाही हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. सुरवाडै यांनी बोलावलेली मीटिंग किंवा घेतलेले निर्णय यास भुसावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा पदाधिकारी जबाबदार राहणार नाही, असेदेखील संतोष सोनवणे यांनी कळवले आहे.
आपण शिवसैनिकच : दिलीप सुरवाडे
मी मूळचा शिवसैनिक आहे, आपल्यावरील आरोपात तथ्य नाही. तालुका प्रमुखांनी काही अडचण असल्यास संपर्क प्रमुखांशी संपर्क साधावा, असे दिलीप सुरवाडे म्हणाले.


