भुसावळात वंशिका प्रतिष्ठान तर्फे स्व किशोर कुमार यांची जयंती साजरी : गीतगायन स्पर्धेत किशोरकुमार यांच्या आठवणींना उजाळा :

भुसावळ – वंशिका प्रतिष्ठान तर्फे भुसावळ येथे स्व किशोर कुमार यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा स्तरीय आयोजित गीत गायन स्पर्धेत एकूण १०७ गायकांनी सहभाग नोंदवला परंतू प्रत्यक्ष ६१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत नवोदित कलाकारांनी स्व किशोर कुमार यांची सुमधुर गीते सादर केल्याने किशोर कुमार यांच्या आठवणीना उजाळा मिळाला . गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
या गीत गायन स्पर्धेचे परीक्षण संगीततज्ज्ञ व ख्यातनाम गायक डाॅ.आनंद चंद्रपूर,श्लोक चौधरी, संगीत नृत्य कला निकेतनचे संचालक सुनिल पाटील व सौ.अनिता पाटील यांनी केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक कुर्बान शहा,द्वितीय क्रमांक कु.धनश्री कुलकर्णी,तृतीय क्रमांक अतुल हिंगोणेकर, तर उत्तेजनार्थ संतोष मेश्राम व चि.मानस पाटील यांनी यश मिळवले.
डॉ सुवर्णा गाडेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ.सुवर्णा गाडेकर सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, सुधीरभाई जंजाळे अध्यक्ष एससीएसटी रेल्वे युनियन, अनिल डोंगरे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषण स्थापत्य विभाग जळगांव,वाल्मिक खाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषण स्थापत्य विभाग जळगांव, प्रेम परदेशी , डॉ महेफुझ सैय्यद, विलास तायडे वंदना पेंट्सचे संचालक, विवेक नरवाडे अध्यक्ष वंशिका प्रतिष्ठान, संभाजी सोनवणे,अखिलेश कुमार, आशिष व्यास,रोहित अडकमोल, आनंद सोनवणे,जितेंद्र उईके, संतोष मेश्राम, समाधान जाधव हे सर्व उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन वंशिका प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक नरवाडे यांनी केले तर आशिष व्यास व संभाजी सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तसेच आभार समाधान जाधव यांनी केले.