धावपटू भावांमुळे शक्य झाले मॅरेथॉनमध्ये धावण्याचे स्वप्न पूर्ण : भुसावळच्या महिला धावपटूंची कृतार्थ भावना “

“धावपटू भावांमुळे शक्य झाले मॅरेथॉनमध्ये धावण्याचे स्वप्न पूर्ण: भुसावळच्या महिला धावपटूंची कृतार्थ भावना”
भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे रक्षाबंधनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व महिला धावपटूंनी पुरुष धावपटूंना विधिवत ओवाळून राख्या बांधल्या व मिठाई भरून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. भुसावळचे सर्व पुरुष व महिला धावपटू एकत्रित सोबत दर मंगळवार, गुरुवार व रविवारी धावण्याचा सराव करीत असतात. याशिवाय देशभरातील विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सोबत सहभागी होत असतात. त्यामुळे सहाजिकच महिला धावपटूंची काळजी घेण्याची जबाबदारी पुरुष धावपटूंची असते व सख्ख्या भावाप्रमाणे ते आपल्या बहिणींची काळजी घेत असतात. त्यामुळेच आपल्या घरची मंडळी आम्हाला धावण्यासाठी नि:संकोच परवानगी देतात. त्यामुळेच की काय भुसावळ शहरातील रस्त्यांवर पहाटेच्या काळोखात धावणे असो किंवा शहराबाहेरील मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे असो आम्ही आमच्या भावांमुळे प्रत्येक ठिकाणी आमचे, आमच्या परिवाराचे व भुसावळ शहराचे नाव उंचावू शकलो अशी कृतार्थ भावना डॉ नीलिमा नेहेते, डॉ चारुलता पाटील, स्वाती फालक, डाॅ वर्षा वाडिले, गुंजन गुप्ता, मंगला पाटील, संगिता चौधरी, गरिमा न्याती, पुष्पलता चौधरी, विनिता शुक्ला, मनिषा सिंग, माधुरी चौधरी, अर्चना चौधरी, भारती चव्हाण, शिला कश्यप, किर्ती मोताळकर, एकता भगत, पूनम भंगाळे, गुड्डी देवी, सुषमा भारती, पुष्पा तिवारी, ममता ठाकूर, सीमा वायकर, डॉ. मीनाक्षी चौधरी, जयश्री चौधरी, विनिता चौधरी, अनिता भिरुड, यज्ञा गणसिंग पाटील या महिला धावपटूंनी यावेळी बोलून दाखविले. विशेष म्हणजे रक्षाबंधन साजरे करण्याआधी सर्व बहिण भाऊ धावपटू आठ ते दहा किमी अंतर एकत्र धावले. त्यासाठी पहाटे सर्वांनी एकत्र वॉर्म अप केले. त्यानंतर आरपीडी रस्त्यावर सर्व धावपटू एकत्र धावले व मैदानावर परत आल्यानंतर प्रविण फालक यांच्या मार्गदर्शनात सर्वांनी एकत्र स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार केला. त्यानंतर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी सुयश न्याती व गरिमा न्याती या धावपटू दांपत्याचे वाढदिवसानिमित्त सर्वांतर्फे अभिष्टचिंतन करण्यात आले व अभिनंदन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रविण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, यज्ञा गणसिंग पाटील, पुनम भंगाळे, सुयश न्याती, गरिमा न्याती, तन्मय जोशी यांचे सहकार्य लाभले.