बडनेरा ते अमरावती शटल सेवा रद्द ;



भुसावळ – विभागातील बडनेरा स्थानक येथे प्लॅटफार्म क्रमांक ०३ आणि ०४ च्या विस्तारीकरणांचे कार्य करण्यात येत आहे.या कार्यासाठी बडनेरा ते अमरावती दरम्यान शटल सेवा दिनांक १७/०८/२०२४ ते १५/१०/२०२४ पर्यंत रद्द करण्यात येत आहे. विवरण पुढीलप्रमाणे
दिनांक १७/०८/२०२४ ते १५/१०/२०२४ पर्यंत शटल सेवा रद्द.
१) ०१३७५ बडनेरा ते अमरावती शटल.
२) ०१३७६ अमरावती ते बडनेरा शटल.
३) ०१३७७ बडनेरा ते अमरावती शटल.
४) ०१३७८ अमरावती ते बडनेरा शटल.
५) ०१३७९ बडनेरा ते अमरावती शटल.
६) ०१३८० अमरावती ते बडनेरा शटल.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.