भुसावळातील हिरवाकुर व पर्यावरण जागर प्रतिष्ठान व बार असोसिएशनतर्फे वृक्षारोपण –


भुसावळ : जिल्हा न्यायालयात 15 ऑगस्टच्या निमित्ताने ध्वजारोहण झाल्यानंतर हिरवाकुर संस्थेचे पदाधिकारी व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगितले.
जिल्हा न्यायाधीश सुनील सूर व बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील यांच्याहस्ते स्व.शहिद नरेंद्र महाजन यांच्या वीर पत्नी अर्चना महाजन, कुर्‍हेपानाचे येथील शहिद राकेश शिंदे यांच्या मातोश्री अनुसूया काशिनाथ शिंदे यांचे त्याचप्रमाणे राधाकृष्ण प्रभात फेरीचे राधेश्यामजी लाहोटी, जैन अलर्ट ग्रुपचे राजेश सुराणा, गौतम चोरडीया, देवेंद्र निमाणी, विनोद मेहता, संजय अग्रवाल कोयला वाले, न्यायालयातील कार्यालय अधीक्षक करुणा भावसार, अधीक्षक स्नेहल शुक्ला, ओ.एस.संजय.बी.मोरे या कार्यक्रमाचे आयोजक हिरवाकुर व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील, रांगोळीकार निलेश नेवे यांचा प्रमाणपत्र देऊन जिल्हा न्यायमूर्ती सुनील सूर यांनी सन्मान केला.
यावेळी जिल्हा न्यायाधीश एस.बी.हेडाऊ, जिल्हा न्यायाधीश एल.डी.गायकवाड, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही.एस.मोरे, हेमा अ.पाटील, आर.एस.पांझणकर, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर एस.व्ही.जंगमस्वामी, एम.आर.बागडे, एस.बी.तिवारी एस.वि.न्यायाधीश व बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील, सचिव विश्वंभर वाणी, सहसचिव पुरुषोत्तम पाटील कोषाध्यक्ष विजय तायडे, सदस्य वृषाली शिरनामे, योगराज बोरसे, आय.आय.खान, पी.ई.नेमाडे, एम.एस.सपकाळे, सुनील घोलप, पी.एच.राठोड, हिरवांकुर संस्थेच्या प्रमुख फैजपूर येथील सोनाली राजपूत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. जावळे, सुहास गाजरे, भूषण चौधरी, शेख अन्सारी, जे.बी.कोटेचा, रांगोळीकार निलेश नेवे आदींचे सहकार्य लाभले.