भुसावळातील झेंडआरटीआय बोगदा ठरतोय जीवघेणा ; संबंधीतांना कधी जाग येणार ?

भुसावळ – झेंडआरटीआय बोगद्यात आता तीन ठिकाणी पाणी तुंबत आहे, रोज दोन ते तीन अपघात होताय, काल सुद्धा येथे एक अपघात झाला , गाडीचे नुकसान तर झालेच मात्र मोटरसायकल स्वारास जबरदस्त मुक्कामार लागला
या जीवघेण्या बोगद्यात पाऊस थांबल्यावर सुद्धा पाणी जमा होतेय
दोन भिंतींच्या जॉईंट मधून अनेक ठिकाणी पाणी लिक होत आहे अतिपावसात तर येथुन ये – जा करणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहे . या बोगद्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे नियोजन शून्य तर आहेच पण याच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांची भूमिका नरोवा कुंजरोवा
याबाबत अधिकाऱ्यांना कळविले तर ते म्हणताय पाणी साचलेच नाहीय यामुळे सामान्य जननागरिकांनी कोणाकडेन्याय मागावा असा प्रश्न उपस्थित होत आहे . संबंधित याची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे
भुसावळ शहर आणि झेडटीसी परिसराला जोडणारा नवीन बोगद्यात पाऊस नसतांनाही तीन ते चार विविध ठिकाणी अस्वच्छ पाणी जमा होत आहे. कमरेपर्यंत जमा होणाऱ्या या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण झाले असून अनेक छोटे मोठे अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच सहाच महिन्यात पाण्यामुळे रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेने रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिल्ली-भुसावळ लाईनवर असलेला जुना रस्ता कायमस्वरुपी बंद करुन त्या ठिकाणी नवीन बोगदा तयार करण्यात आला. परंतु, हा बोगदा नवीन समस्या निर्माण करत आहे. पावसामुळे माती वाहून जाते, खड्डेही निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी तर संरक्षक भिंतीतूनच पाणी गळत आहे. त्यामुळे आधीचाच रस्ता सुरक्षित होता अशी प्रतिक्रिया वाहनधारकांमध्ये उमटू लागल्या आहे.
तालुक्यातील झेडटीसी, फेकरी, दिपनगर, अनेक गावांसाठी हा मार्ग सोईस्कर आहे, तेथून रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी एकुणच सुरळीत वाहतुकीसाठी रेल्वे रुळाखालून मार्ग काढत बोगदा तयार करण्यात आला. परंतु तो वाहतुकीसाठी योग्य बोगदा नसून एक नाल्यासारखाच असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. त्यातून कदापीही सुरळीत व सुरक्षित वाहतुक होणार नसल्याचे प्रवाशांसह वाहनधारकांनीही रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. परंतु अधिकारी उपाययोजना करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पहिल्याच पावसाळ्यात बोगद्यातील काँक्रीट वाहून गेल्यामुळे बोगद्यात मोठे खड्डे पडले. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊन येथे अनेक दुचाकींना अपघात होत आहे. वाहनधारक जखमी होत आहे व चारचाकी वाहन बंद पडत आहेत.
दर्जेदार काम नाहीच
याच बोगद्याच्या रस्त्यावर आधी पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते, ते दोन महिन्यात उध्वस्त झालेत त्याखालील माती आता बोगद्यात वाहून येते ती माती काढण्यात आली नाही, रेल्वे प्रशासनाकडून इतर ठिकाणी बोगदे तयार करण्यात येत आहेत, ते अगदी नियोजनपूर्वक कामे होत आहे, त्याचप्रमाणे येथेही बोगद्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे सुमारे ८ हजार नागरिकांची सोय होईल.असेही म्हटले जात आहे .