भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिवस साजरा –

भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथालय दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी व ग्रंथालय प्रमुख प्रा.हितेश गुप्ता यांच्याहस्ते सियाल राममित्र रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रंथपाल हितेश गुप्ता यांनी सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथालयात नेऊन उपलब्ध असणार्‍या विभिन्न पुस्तकांचे वाचन करावे, असे आवाहन करीत ग्रंथालयाचा परिचय करून दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनीही विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आवडीची चांगली पुस्तके अवश्य वाचावी तसेच ग्रंथ हेच खरे गुरू असतात. असे विचार मांडले. 13 ते 15 ऑगस्ट या काळात देशपातळीवर ‘हर घर तिरंगा’ अभियाना अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी तिरंगा लावून तिरंग्याला सलामी देत सेल्फी काढावी, असे आवाहनही त्यांनी केले. सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.