भुसावळ -१२- : पुण्यात प्लॅट न घेण्यासाठी 50 लाख रुपये आणावेत म्हणून भुसावळ तालुक्यातील 33 वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी प्रियंका प्रशांत पाटील (33, जळगाव) या विवाहितेच्या फिर्यादीवरून आरोपी पती प्रशांत भीमराव पाटील, प्रमिला भीमराव पाटील, भीमराव वामन पाटील, योगीता लक्ष्मण पाटील (सर्व रा.वाघूळदे नगर, एसएमआयटी कॉलेजमागे, ज्ळगाव) विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी विवाहितेला चांगला स्वयंपाक येत नाही, घरातील कामे येत नाहीत तसेच पतीसाठी प्लॅट घेण्यासाठी माहेरून 50 लाख रुपये न आणल्याने पतीसह चौघा आरोपींनी शारीरीक मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने पीडीतेने भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास एएसआय श्यामकुमार मोरे करीत आहेत.


