भुसावळ –
कलाकारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वंशिका प्रतिष्ठान, भुसावळ तर्फे स्व.किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी गायलेल्या गीतांच्या जिल्हा स्तरीय गीतगायन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता, भुसावळ येथील कृष्णचंद्र सभागृह येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता संपूर्ण जिल्ह्याभरातुन प्रवेश मागविण्यात येत आहेत. या स्पर्धेअंतर्गत स्पर्धकांना केवळ स्व.किशोर कुमार यांची गाणे गायचे आहे.

यामध्ये प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र व विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेकरिता प्रवेश स्वीकारण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असून, ज्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संपर्क ९८९०२३००३०, ९३७३५३६५०१, ९६२३९६१६०३, ७२१८८४४८७७, ९९७५६९८४१८
जास्तीतजास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा तसेच हा कार्यक्रम फेसबुक पेजवर लाइव्ह बघता येईल असे आयोजकांकडून कळविण्यात येत आहे.


